शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

साखर विक्रीचा हमीभाव ३४ रुपये निश्चित करा; जयंत पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:17 IST

इस्लामपूर : साखर कारखानदारीला मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे साखर विक्रीचा हमीभाव प्रतिकिलो २९ ...

इस्लामपूर : साखर कारखानदारीला मदत करण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे साखर विक्रीचा हमीभाव प्रतिकिलो २९ रुपयांऐवजी ३४ रुपये निश्चित करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याच्या साखराळे युनिटच्या २०१८-१९ च्या ४९ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आ. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, अतिरिक्त साखर हे या उद्योगासमोरील मोठे संकट आहे. गेल्यावर्षीची १०० लाख क्विंटल साखर शिल्लक असून, यावर्षी साधारण ३०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. आपल्या देशाची २४२ लाख क्विंटल साखरेची गरज आहे. म्हणजे हा हंगाम संपताना १५८ लाख क्विंटल अतिरिक्त साखर देशात असणार आहे. मध्यंतरी शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिवांना बोलावून साखर उद्योगासमोरील अडचणी सांगितल्या आहेत. सरकारने साखर विक्रीची किंमत ३५०० रुपये केली, तर बरेच प्रश्न सुटणार आहेत. राज्य सरकारने साखर निर्यातीस केंद्र सरकारप्रमाणे वाहतुकीस अनुदान जाहीर करावे. मध्यंतरी मी व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या लवादाने तोडणी मजुरांना सध्याच्या दरावर ५ टक्के वाढ केलेली आहे. आपल्या ‘लक्ष्य १०० टनाचे’ या प्रकल्पास मोठे यश मिळाले आहे.ते म्हणाले, परिपक्व ऊस उत्पादनासाठी शेती विभागामार्फत मार्गदर्शन होणार आहे. लहान शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन वाढविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाईल. यापुढील काळात ऊस नोंदणी, तोडणी अशी सर्व कामे मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शीपणे केली जाणार आहेत.